महाराष्ट्रात कोरोना विषाणूंच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा तिसरा मृत्यू रायगडमध्ये ६९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मुंबई : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे झालेला हा तिसरा मृत्यू आहे. यापूर्वी या व्हेरियंटमुळे पहिला मृत्यू रत्नागिरी जिल्ह्यात आणि नंतर मुंबईत झाल्याची नोंद आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे ६९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत यापूर्वी डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता. या ६३ वर्षीय महिलेने लसीचे दोन्ही डोस घेतले होते. ती २१ जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळली आणि तिचा २७ जुलै रोजी मृत्यू झाला होता.

या महिलेला डायबिटीससह इतर अनेक आजार होते‌. अलिकडे डेल्टा प्लसचे सात रुग्ण आढळले होते. त्यामध्ये या महिलेचा समावेश होता. त्यांचा जीनोम सिक्वेन्स अहवाल ११ ऑगस्ट रोजी आला. त्यांच्या संपर्कात असलेल्या दोघांची तपासणी करण्यात आली. तेही डेल्टा प्लस संक्रमित असल्याचे आढळले. ही महिला ऑक्सिजन सपोर्टवर होती. तिला स्टिरॉईड आणि रेमडेसिविर देण्यात आले होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here