मुंबई : महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कोरोनाची तिसरी लाट संपुष्टात येईल असा दावा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. कोरोनाच्या नव्या स्थितीत नव्याने निर्बंध लागू करण्याऐवजी दर आठवड्याला साप्ताहिक निर्बंध शिथिल केले जातील असे ते म्हणाले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, कोरोना संक्रमितांची संख्या सातत्याने कमी होत आहे. मात्र, ज्या भागांमध्ये आतापर्यंत संक्रमण वाढले नव्हते, त्या भागात आता रुग्ण वाढत असल्याचे दिसू लागले आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढल्याची आकडेवारी दिसत आहे
आम्हाला विश्वास वाटतो की, ज्याचा रुग्ण असलेल्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर हा ग्राफ कमी होईल. तज्ज्ञांनी अशीच शक्यता वर्तविली आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तिसरी लाट ओसरेल असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.