कोल्हापुर: कोल्हापुरातील दत्त दालमिया साखर कारखान्याने २४ नोव्हेंबरला ऊस गाळप हंगामाची सुरवात केली होती आणि या गाळप हंगामासाठी कारखान्याने प्रति टन 2943 रुपये एफआरपी दिली आहे, जो या हंगामातील सर्वाधिक भाव आहे. महापुरामुळे उसाचा तुटवडा, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी तसेच ऊस दर वाद यामुळे यंदाचा हंगाम ताणलेला असताना. राज्यातील सर्व साखर कारखान्यांपुढे दत्त दालमिया साखर कारखान्याने आदर्श ठेवला आहे.
साखर कारखान्यांना एफआरपी १४ दिवसात देणे बंधनकारक आहे. आणि यंदाच्या साखर हंगामासाठी २०० रुपये अधिक असा तोडगा शेतकरी संघटनेच्या मागणी प्रमाणे निघाला होता.
दत्त दालमिया साखर कारखान्याची दैनिक गाळप क्षमता ७ हजार टन च्या वरती असल्यामुळे उसाची उचल मोठ्या प्रमाणात होत आहे. एकरकमी एफआरपी 2943 रुपयेप्रमाणे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती (केडीसीसी) बँकेत शेतकऱ्यांचा खात्यावर जमा केली त्यामुळे ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण आहे.
Audio Playerहि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.