देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिसा, जम्मू-कश्मीर आदी राज्यांमध्ये पेट्रोलचे दर १०० रुपयांवर आहेत. देशात पेट्रोल, डिझेलचा वापर जेवढा जादा होतो, तेवढ्याच त्याच्या किमती चढ्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये यामध्ये बेसुमार वाढ झाली आहे. एखाद्या दिवशी या दरात घट झाली तरी त्याचा लोकांना फासा फायदा मिळालेला नाही. अशा स्थितीत तामीळनाडू सरकारने सर्वसामांनाना दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे. तामीळनाडू सरकारने राज्यात पेट्रोलवरील कर तीन रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली आहे. कर कपातीच्या आधी राज्यात पेट्रोलवर १५ टक्के आणि प्रती लीटर १३.०२ रुपये (एकूण २४.२६ रुपये) कर आकारणी केली जात होती.
तामीळनाडूचे अर्थमंत्री पलानीवेल त्यागराजन यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडताना सांगितले की, सरकारने पेट्रोलवरील करात तीन रुपयांची कपात केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील जनतेला दिलासा मिळाले. तर राज्य सरकारला वार्षिक ११६० कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान होईल. चेन्नईत एक लिटर पेट्रोल १०२.४९ रुपये आणि डिझेल ९४.३६ रुपये आहे.
अर्थमंत्री म्हणाले, की पेट्रोल आणि डिझेलच्या चढ्या किंमतीसाठी केंद्र सरकार जबाबदार आहे. मे २०१४ मध्ये पेट्रोलवर १०.३९ रुपये प्रती लिटर कर होता. केंद्र सरकारने तो वाढवून ३२.९० रुपये प्रती लिटर केला आहे. अशाच पद्धतीने डिझेलवर २०१४ मध्ये ३.५७ रुपये कर होता. तो वाढवून ३१.८० रुपये प्रती लिटर करण्यात आला आहे. तामीळनाडूत २.६३ कोटी दुचाकी वाहने आहेत. निवडणुकीवेळी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी सत्तेवर आल्यास पेट्रोलमध्ये ५ रुपये आणि डिझेल चार रुपये प्रती लिटर दरकपात करण्याची घोषणा केली होती.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link