ह्या सहकारी साखर कारखान्याची धुराडी पुन्हा पेटली

937

तिरुप्पूर (तमीळनाडू) : चीन मंडी

सलग दोन वर्षांच्या दुष्काळी स्थितीनंतर कृष्णपूरममधल्या अमरावती सहकारी साखर कारखान्याचे धुराडे यंदा पुन्हा पेटले आहे. कारखाना व्यवस्थापनाने शेतकऱ्यांसोबत करार केले असून, १ लाख ३५ हजार टन ऊस गाळप करण्याची तयारी केली आहे.

दर वर्षी तिरुप्पूर आणि दिंडीगुल जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी करार करणाऱ्या कारखान्याने यंदा कुमारलिंगम, कनैयूर, नैकरपट्टी, पलानी, धरमपूरम आणि पल्लाडम या परिसरातही ऊस नोंदणी केली आहे. या परिसरात जवळपास साडे तीन हजार हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली आहे. कारखान्यात दिवसाला १२०० ते १५०० टन ऊस गाळप करण्याची क्षमता आहे. ३० मार्च रोजी सुरू झालेले गाळ पुढचे साधारण पाच आठवडे चालण्याची शक्यता आहे. या संदर्भात लेबर प्रोग्रेसिव्ह फेडरेशनचे सचिव पी. महालिंगम म्हणाले, ‘परिसरात सलग दोन वर्षे दुष्काळ होता. त्यामुळे कारखान्यात ऊस गाळप झाले नाही. त्यामुळे कारखाना कर्मचारी आणि शेतकऱ्यांना खूप मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले.’

मधल्या काळात कारखान्याने राज्यातील इतर सहकारी कारखान्यांच्या मळीपासून स्पिरिट, अल्कोहोल तयार केले, त्यामुळे किमान कामगारांचे पगार होऊ शकले. आता कारखान्यात ऊस गाळप सुरू झाल्याने सगळे काही सुरळीत सुरू होईल, असे मत कारखान्यातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले. ऊस उत्पादकांना २८०० रुपये दर देण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. राज्य सरकारने उसाचा दर वाढवावा, अशी मागणी कटची सरबत्रा विवासैगल संगम संस्थेचे जिल्हाध्यक्ष एम. इश्वरन यांनी केली. ते म्हणाले, ‘ऊस तोड झाल्यानंतर लगेच शेतकऱ्यांना पैसे मिळावेत, याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच शेतकऱ्यांची यापूर्वीच थकबाकीही मिळायला हवी.’

डाउनलोड करे चीनीमंडी न्यूज ऐप:  http://bit.ly/ChiniMandiApp

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here