यंदा पुन्हा कांदा रडवणार, सणांचे रंग पडणार फिके

यंदाही कांद्याच्या दरामुळे सणांचा आनंद बिघडण्याची शक्यता आहे. खरीप पिकातील लावणीतील उशीर आणि अनेक कारणांमुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या कालावधीत कांद्याच्या चढ्या दरामुळे सर्वसामान्य जनतेला घाम फुटू शकतो. क्रिसीलच्या एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे.

अहवालानुसार या वर्षी कांद्याचे उत्पादन करणाऱ्या विभागांमध्ये ऑगस्ट महिन्यातील मान्सूनचा पाऊस कमी झाला. त्यामुळे या पिकाच्या लावणीस उशीर झाला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार भारतात दर महिन्याला कांद्याचा सरासरी खप १३ लाख टन इतका होतो. खरीप पिकांचे उत्पादन येण्यास होणारा उशीर, बफर स्टॉकची कमतरता आणि तोक्तेसारख्या चक्रीवादळासह इतर कारणांमुळे कांद्याचे दर वाढतील अशी शक्यता आहे.

या अहवालानुसार जर २०१८ मधील कांद्याच्या दराशी तुलना केली तर यंदा हे दर १०० टक्के वाढू शकतात. म्हणजेच दर दुप्पट होऊ शकतात. यावर्षी खरीप पिकांसाठी कांद्याचा घाऊक दर ३० रुपयांवर जाऊ शकतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दर थोडा कमी राहील. वस्तूतः २०१८ मधील कांदा पिकाचा दर हा सामान्य मानला जातो. या वर्षानंतर यामध्ये सातत्याने वाढ दिसून आली आहे. २०२० मध्ये कांद्याचा दर २०१८च्या तुलनेत दुप्पट झाला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा</spa
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here