यंदा रब्बी हंगामातील पिकांवर गव्हाचे राज्य

नवी दिल्ली : सध्या रब्बी पिकांच्या पेरणीची धांदल सुरू आहे. शेतकरी बाजार आणि सरकारी केंद्रांतून बियाणे खरेदी करीत आहेत. सरकारनेही रब्बी पिकाच्या उत्पादनाची आकडेवारी जमा करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारकडे उपलब्ध आकडेवारीनुसार, दरवर्षीप्रमाणे यंदाही गव्हाचे उत्पादन सर्वाधिक होणार आहे. गेल्या काही वर्षात याची आकडेवारी वेगाने वाढली आहे. त्यानंतर इतर पिकांची पेरणी केली जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीचे उत्पादनाचे क्षेत्र २४ लाख हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. लागवडीतील ही वाढ पाहता केंद्र सरकारने समाधान व्यक्त केले आहे.

एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारकडील आकडेवारीनुसार, देशात ३०४ लाख हेक्टर क्षेत्रात गव्हाची लागवड केली जात आहे. त्यापाठोपाठ ४५ लाख हेक्टरमध्ये भाताचे क्षेत्र असेल. डाळवर्गीय पिकांचे लागवड क्षेत्र १५० लाख हेक्टरचे आहे. इतर पिकांचे क्षेत्र अत्यल्प राहील. केंद्रीय कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी रब्बीच्या आकडेवारीचा आढावा घेतला. गेल्या वर्षी समान कालावधीत १३८.३५ लाख हेक्टरमध्ये गव्हाची पेरणी झाली होती. यंदा आतापर्यंत १५२.८८ लाख हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंद १४.५३ लाख हेक्टर क्षेत्राची वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षात ही वाढ सर्वाधिक आहे. सरकारी आकडेवारीनुसार २५ नोव्हेंबरअखेर एकूण रब्बी लागवड ३५८.५९ लाख हेक्टर क्षेत्रात झाली आहे. गेल्यावर्षी समान कालावधीत ही लागवड ३३४.४६ लाख क्षेत्रात होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here