ऊस बिले देण्यात हलगर्जीपणा आणि शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्यास तुरुंगात पाठवू: मुख्यमंत्री योगींचा इशारा

लखीमपूर खिरी: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिले वेळेवर दिली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे. ऊस बिले अथवा थकबाकी देण्यास हलगर्जीपणा करणाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना भावना दुखावणाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. गोला गोकर्णनाथ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचारासाठी ते आले होते. ते म्हणाले, मी इथे शेतकऱ्यांना आश्वासन देतो की, तुमच्या ऊस बिलाची पै अन् पै दिली जाईल. सर्व साखर कारखान्यांसोबत बिल देण्यासंदर्भात बैठकांचे आयोजन केले आहे.

मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले, नव्या गळीत हंगामाच्या सुरुवातीबरोबरच प्रत्येक शेतकऱ्याला ऊस बिले दिली गेली पाहिजेत यासाठी मी निर्देश दिले आहेत. जे शेतकऱ्यांच्या भावना दुखावण्याचे काम करतात, त्यांच्यासाठी आमचे कारखाने भ्रष्ट लोकांची प्रतीक्षा करीत आहेत, हे लक्षात ठेवा. लखीमपूर खिरी आणि आसपासचे जिल्हे ऊस शेतीसाठी ओळखले जातात. गोला गोकर्णनाथ विधानसभा पोट निवडणूक भाजपचे आमदार अरविंद गिरी यांच्या निधनानंतर होत आहे. भाजपने येथे त्यांचा मुलगा अमन गिरी यांना उमेदवारी दिली आहे. तर समाजवादी पक्षाचे माजी आमदार विनय तिवारी रिंगणात आहेत. बसपा आणि काँग्रेस या पोटनिवडणुकीपासून दूर राहिल्याने दुरंगी निवडणूक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here