ऊसतोड मजूर महिला करत आहेत गर्भाशय शस्त्रक्रिया: नितीन राऊत

बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील हजारो ऊसतोड महिलांनी मासिकपाळी दरम्यान त्यांनी कष्टाची कामं करता येत नसल्याने गर्भाशय शस्त्रक्रिया करून घेतली आहे. काम न केल्याने मजुरी मिळत नसल्याने, अवघ्या काही दिवसांच्या मजुरीच्या पैशांसाठी त्यांना हा निर्णय घ्यावा लागत आहे, हे अत्यंत दुःखद आहे. असे नितीन राऊत यांनी म्हटले आहे. या समस्येबाबत उपाययोजना करण्यासाठी सरकारकडून तातडीने उपाययोजना केली जावी, अशी पत्राद्वारे विनंती केली आहे.
बीड जिल्ह्यातील सुमारे 13 हजार ऊसतोड मजूर महिलांची गर्भाशये काढल्याची धक्कादायक माहिती चौकशी समितीच्या तपासात काही महिन्यापूर्वी उघडकीस आली होती. महिलांमधील आरोग्याबद्दलचे अज्ञान, लहान वयात होणारे विवाह , गरिबी यातून हे प्रकार घडल्याची माहिती त्यावेळी विधान परिषदेत चौकशी समितीच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोर्‍हे यांनी दिली होती. या महिलांना कामाच्या ठिकाणी मूलभूत व प्राथमिक सुविधा पुरविण्याच्या शिफारशी देखील समितीने केलेल्या आहेत.

ऊसतोड मजूर म्हणून काम करणार्‍या माहिलांना वर्षांला एक लाख ते दीड लाखापर्यंत मजुरी मिळते, त्यातील खासगी रुग्णालयात गर्भाशये काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेसाठी 25 ते 30 हजार रुपये खर्च करतात. सरकारने तातडीने याबाबत काहीतरी उपाययोजना करावी, अशी मागणी देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here