निलंगा तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे तीन एकर ऊस जळाला

निलंगा : शॉर्टसर्किट होऊन तालुक्यातील काटेजवळगा येथील दिपक विलासराव पाटील यांचा तीन एकर ऊस जळाल्याची घटना रविवार (दि ७) घडली. पाटील यांच्या शेतातून विद्युत पुरवठा करणारी मेन लाईन गेली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून एका ठिकाणी विद्युत पुरवठा सुरू असताना स्पार्किंग होऊन थिनग्या पडत असल्याबाबत दिपक पाटील यांनी वारंवार महावितरण कर्मचाऱ्यांना तोंडी सूचना देऊनही केवळ त्यांच्या हलगर्जीपणामुळे रविवारी दुपारी ऊसाला आग लागली. बघता बघता पाच एकर पैकी तीन एकर ऊस जळाला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन एकर ऊस वाचला. जळलेला ऊस तात्काळ कारखान्याला देण्यात यावा व महावितरणकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here