डोईवाला साखर कारखान्याचे तीन कर्मचारी कोरोना संक्रमित

245

डोईवाला : डोईवालामध्ये कोरोनाचा गतीने फैलाव सुरू झाला आहे. शुक्रवारी डोईवाला साखर कारखान्यालाही याचा फटका बसला. कारखान्यातील तीन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली.

शुक्रवारी डोईवाला साखर कारखान्यातील तीन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. डोईवाला आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधीक्षक कुंवर सिंह भंडारी यांनी सांगितले की, कारखान्यातील तीन कर्मचारी पॉझिटिव्ह आळले. त्यांना घरातच आयसोलेट करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांची तपासणी सुरू आहे.

कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की कारखाना प्रशासनाने परिसरात कोणतेही सॅनिटायझेशन मोहीम राबविलेली नाही. कोरोनापासून बचावासाठी काहीही उपाय सुरू नसल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here