मुंबईमध्ये तीन संक्रमितांचा मृत्यु

मुंबई: मुंबईमध्ये रविवारी कोरोना संक्रमणामुळे तीन संक्रमितांचा मृत्यु झाला आहे. नगर आयुक्त आई.एस चहल यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी मार्चनंतर एका दिवसात झालेल्या मृत्युंच्या तुलनेत ही सर्वात कमी संख्या आहे. चहल यांच्या नुसार, हे महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपाीलिका (बीएमसी) यांच्या कठोर मेहनतीचा परिणाम आहे. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, तीन रुग्णांच्या मृत्युनंतर मुंबईमध्ये मृतांची एकूण संख्या वाढून 11,135 पर्यंत पोचली आहे.

राज्य सरकारने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरामध्ये एका दिवसात 581 नवे रुग्ण आढळल्यानंतर एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2,95,241 झाली आहे. मुंबई डिवीजन, ज्यामध्ये मुंबई शहर आणि उपनगर सामिल आहे तिथे 1,148 नवे रुग्ण समोर आले आहेत आणि 7 मृत्यु झाले आहेत.

तर नाशिकमध्ये 24 तासात 257 कोरोना रुग्ण आढळले आहेत. आणि एकूण सक्रमितांची संख्या वाढून 1,10,882 पर्यंत पोचली आहे. नउ संक्रमितांच्या मृत्युनंतर मरणार्‍यांची संख्या 1,983 पर्यंत पोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 174 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 1,07,150 लोक या महामारीनंतर बरे झाले आहेत. महाराष्ट्रात राज्यामध्ये रविवार कोरोना संक्रमणाचे 3,282 नवे रुग्ण समोर आले होते त्यानंतर राज्यामध्ये एकूण संक्रमित रुग्णांची संख्या वाढून 19,42,136 पर्यंत पोचली आहे. आरोग्य विभागानुसार, या अवधीमध्ये या संक्रमणामुळे 35 आणखी मृत्युनंतर राज्यामध्ये मृतांची संख्या वाढून 49,666 पर्यंत पोचली आहे. आरोग्य विभागानुसार, 2,064 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्यांची एकूण संख्या 18,36,999 पर्यंत पोचली आहे. राज्यामध्ये आतापर्यंत एकूण 54,317 संक्रमितांवर उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here