तीन नव्या प्रजातीतून ऊस शेतीत क्रांती घडणार

409

सोहावल (अयोध्या) : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय ऊस संशोधन संस्थेने सीओ १५०२३ आणि कोलख १४२०१ तसेच कोसा १४२३३ या उसाच्या नव्या प्रजाती विकसित केल्या आहेत. या प्रजाती ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वरदान ठरतील.

राज्याच्या ऊस विभागाने या प्रजातीच्या प्रसारासाठी नियोजन केले आहे. नव्या प्रजातींमधून शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळेल असा दावा विभागाचा आहे. त्यासाठी या प्रजातीच्या बियाण्यांची संख्या वाढवली जात आहे. पुढील हंगामात सुमारे १७५ हेक्टरवर या तीन प्रजातींची लागवड होईल. त्यानंतर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे बियाणे पोहोचवले जाईल.
सीओ आणि कोलख या जातीचा ऊस शेतात पडण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे ऊस बांधण्याचे काम वाचते. यातील दुसरी प्रजाती मध्यम आकाराची असते. मात्र, ऊस मोठा असतो. तसेच यामध्ये किटकांचे प्रमाण कमी असते. त्याच्या गुळाचा रंग आणि गुणवत्ता उच्च दर्जाची आहे. हे फायदे लक्षात घेऊन या तीन प्रजातींचा प्रसार केला जाणार आहे.
राज्यातील ५० जिल्ह्यांत सुमारे ३५ लाखांहून अधिक शेतकरी ऊस शेतीशी जोडले गेले आहेत. रोजागाव साखर कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक निष्काम गुप्ता व ऊस विभागाचे व्यवस्थापक इकबाल सिंह यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मार्च महिन्याआधी उसाची पेरणी करावी. तरच त्यातून चांगल्या प्रकारचे उत्पादन मिळेल.

ऊस विभागाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी तिन्ही जातींचा ऊस १७५ हेक्टरमध्ये तयार करून बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. या नव्या जाती फायदेशीर ठरतील असे शेतकऱ्यांचेही म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here