उत्तराखंडमध्ये ऊसाच्या तीन नव्या प्रजाती विकसित, शेतकऱ्यांना मिळणार फायदा

उत्तराखंड राज्यात ऊस पिकासाठीचा दीर्घ कालावधी, जादा पाऊस आणि चांगल्या पोषक तत्वांची गरज असलेले पिक उपलब्ध आहे. ब्राझीलनंतर भारत जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. अशात उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामीळनाडू, बिहार राज्यात ऊस शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र, उसावर लाल सड रोड, स्मटसह इतर किडींच्या प्रादुर्भावाने मोठे नुकसान होत आहे.

शेतकऱ्यांच्या या अडचणी दूर करण्यासाठी गोविंद वल्लभ पंत कृषी तथा तंत्रज्ञान विद्यापीठाने (व्हीव्ही) नवा प्रयोग यशस्वी केला आहे. व्हीव्हीतर्फे उसाच्या तीन प्रजाती विकसित करण्यात आल्या आहेत. या रोग आणि किटकांना प्रतिकार करण्याऱ्या प्रजाती आहेत. साखरेच्या बाबतीत सध्याच्या प्रजातींच्या तुलनेत या प्रजातीचे वाण अधिक समृद्ध आहे.
पंतनगर व्हीव्हीचे संशोधक डॉ. अजित सिंह नैन यांनी सांगितले की, पंत १२२२१, पंत १२२२६ आणि पंत १३२२४ या प्रजाती विकसित करण्यात आल्या आहेत. व्हीव्हीचे ऊस संशोधक डॉ. आनंद सिंह जीना आणि डॉ. सुरेंद्र पाल यांनी हे वाण विकसित केले आहेत. त्यांच्यासह तज्ज्ञ डॉ. धीर सिंह, डॉ. आर, के, साहू व डॉ. गीता शर्मा यांनीही यामध्ये योगदान दिले आहे. या प्रजातींच्या राज्यस्तरीय परिक्षणात ऊस संशोधन केंद्र काशीपूरचे संशोधन डॉ. संजय कुमार, डॉ. सिद्धार्थ कश्यप, प्रमोद कुमार, कृषी विज्ञान केंद्र धनौरीचे डॉ. पुरुषोत्तम कुमार, डॉ. विनोद कुमार, कृषी विज्ञान केंद्र ढकरानीचे डॉ. संजय कुमार राठी, कीटक तज्ज्ञ डॉ. रवी मौर्य यांचे मोठे सहकार्य मिळाले. या प्रजातींना मान्यता मिळाल्यानंतर विद्यापीठाचे कुलपती डॉ. तेज प्रताप, विभागप्रमुख डॉ. सलिल तिवारी यांनी सर्व संशोधकांचे अभिनंदन केले. या तीन प्रजातींना उत्तराखंड राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऊस निवड समितीकडूनही मंजूरी मिळाली आहे. आता उधमसिंहनगर आणि नैनीताल जिल्ह्यातील शेतकरी या प्रजातींचा वापर करू शकतात.
To receive ChiniMandi updates on WhatsApp, please click on the link below.
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here