तीन कारखान्यांची धुराडी बंद, ऊस टंचाईचा परिणाम

85

पुणे: पाणीटंचाईमुळे गाजत असलेल्या मराठवाडा भागातील “शरद पैठण” सहकारी साखर कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता १२५० टनाची आहे. यंदा पुरेसा ऊस नसला तरी कारखान्याचे धुराडे १३ डिसेंबरपासून सुरू करण्यात आले. मात्र, २६०० टन ऊस गाळप करून २५ डिसेंबरला कारखाना बंद करावा लागला. मुळात मजूरटंचाई आणि ऊसाची उपलब्धता नसताना या कारखान्यांनी धुराडी पेटवून आर्थिक ताण ओढावून घेतला,” असे मत साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केले.

नगरच्या “केदारेश्वर” कारखान्याची क्षमता प्रतिदिन २५०० टन गाळपाची आहे. तीन डिसेंबरला ‘केदारेश्वर’ सुरू करून दोन हजार टनाचे गाळप होते ना होते; तोच ९ डिसेंबरला गाळप बंद करण्यात आले.
“बीडच्या ‘जयभवानी’ सहकारी साखर कारखान्याने सात डिसेंबरला हंगाम सुरू केला होता. या कारखान्याकडेही पुरेसा ऊस नव्हता. त्यामुळे २२ हजार टनाचे गाळप करून धुराडे बंद करावे लागले आहे.

“राज्यात ऊसाची उपलब्धता कमी असल्यामुळे साखर कारखान्यांचा गाळप हंगाम यंदा केवळ ७० ते ९० दिवसांचा राहील,” असे साखर आयुक्त गायकवाड यांनी स्पष्ट केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here