मेरठ, उत्तर प्रदेश: उस शेतकर्यांना साखर कारखान्यांकडून त्यांची थकबाकी भागवण्यात विलंब होत आहे. उस विभाग साखर कारखान्यांना नोटीस पाठवल्याचा दावा करत आहे, पण साखऱ कारखान्यांवर गेल्या गाळप हंगाम 2019-20 चे सध्या 288.25 करोड रुपये देय आहेत. शुक्रवारी मवाना कारखान्याने आठ करोड आणि किनौनी साखर कारखान्याने 1.52 करोड रुपयांची उस थकबाकी भागवली आहे. शुक्रवारी मेरठ मंडलमध्ये 13.80 करोड ची थकबाकी भागवली आहे. मेरठ जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांवर नजर टाकली तर सहा कारखान्यांमध्ये तीन कारखान्यांनी पूर्ण थकबाकी भागवली आहे. ज्यामध्ये दौराला, नंगलामल आणि सकौती कारखाना सामिल आहे. याशिवाय मवाना, किनौनी आणि मोहिद दीनपुर साखर कारखान्यांवर क्रमश: 119.78 करोड, 133.61 करोड, 34.86 करोड रुपये देय आहेत.