टिकटॉक कंपनीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५ कोटी रुपयांची मदत

139

मुंबई दिनांक २८: टिकटॉक कंपनीने (बाईट डान्स (इंडिया) टेक्नॉलॉजी, प्रा. लि) कोविड विरुद्ध च्या लढ्यात आपला सहभाग नोंदवला असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५ कोटी रुपयांची मदत जमा केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मदतीसाठी टिकटॉक कंपनीला मनापासून धन्यवाद दिले आहेत.

टीकटॉक इंडियाचे प्रमुख निखील गांधी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयास पत्र पाठवून कोविड १९ विरुद्धच्या त्यांच्या लढ्याची माहितीही कळवली आहे. ते म्हणतात की, मुंबई आणि महाराष्ट्रात टिकटॉकच्या कर्मचाऱ्यांची संख्या १ हजारावर असून राज्याप्रतीच्या सामाजिक दायित्वाची त्यांना जाणीव आहे. महाराष्ट्र पोलीसदलातील कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने गृहविभागाला एक लाख मास्क उपलब्ध करून दिल्याची माहिती ही त्यांनी दिली आहे

टिकटॉक वापरकर्त्यांपर्यंत कंपनीने कोविड १९ संदर्भातील माहिती ऑनलाईन पद्धतीने पोहोचवून जनजागृतीचे काम केले आहे. कोविड १९ युद्धात सहभागी होण्यासाठी टिकटॉक ॲपवर लाईव्ह डोनेशन जमा करण्याच्या व्यवस्थेसह या मदत कार्यात सहभागी होण्याचे आवाहन कंपनीकडून करण्यात येत आहे.

या जागतिक आपत्तीमध्ये जबाबदार कॉर्पोरेट सिटिझन म्हणून कोविड १९ विषाणु विरूद्धच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी, सहकार्य करण्यासाठीच कंपनीने ही पाऊले उचलल्याचे श्री. गांधी यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here