ऊसाच्या उपलब्धतेमुळे कारखान्याची हंगाम समाप्ती तारीख लांबणीवर

मुजफ्फरनगर : जिल्हयातील साखर कारखान्यांना ऊसाच्या मोठया उत्पादनामुळे आपल्या गाळप हंगामाच्या समारोपाच्या तारखा बदलाव्या लागत आहेत. इतका ऊस येईल, याचा कारखान्यांना अंदाज नव्हता. तितावी कारखाना आता ५ जून पर्यंत चालेल.

जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांनी एका महिन्यापूर्वी गाळप हंगाम समारोपाची तारीख दिली होती. यामध्ये टिकौला, रोहाना, खाईखेडी आणि भैसाना यांनी १० ते १५ मे दरम्यान गाळप हंगाम समाप्ती बाबत सांगितले होते. पण सातत्याने ऊस आल्यानंतर हे सर्व कारखाने १५ दिवस उशिरा बंद झाले. इतका ऊस येईल असा अंदाज या कारखान्यांनाही नव्हता. तितावी, मोरना, खतौली आणि मंसूरपुर यांनी निश्चित केलेली तारीख सतत पुढे जात होती. सातत्याने ऊस येत असल्याने हे कारखाने ५ जूनपर्यंत चालण्याची शक्यता आहे. खतौली कारखान्याने ५ जूनला हंगाम समारोपाबाबत सांगितले होते. पण ही तारीखही आता पुढे जाण्याची शक्यता आहे. खतौली आणि मोरना आता ८ जून पर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे. मंसूरपुर कारखाना १० जूनपर्यंत सुरु राहील, कदाचित ही तारीखही पुढे जाण्याची शक्यता आहे. डीसीओ आरडी द्विवेदी यांनी सांगितले की, ऊसाचे उत्पादन कारखान्यांनी जो विचार केला त्यापेक्षाही अधिक झाले आहे. परिणामी त्यांचे गाळप हंगाम समारोपाचे गणित बिघडले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here