आज बाराव्या दिवशीही दिलासा, पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

सरकारी तेल कंपन्यांनी आज सलग १२ व्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही. १७ जुलैपासून डिझेलच्या दरात बदल झालेला नाही. तर पेट्रोलमध्ये २९ ते ३० पैशांची वाढ झाली. त्यानंतर दर वाढलेले नाहीत.
आज दिल्लीत पेट्रोलचा दर १०१.८४ रुपये तर डिझेलचा दर ८९.८७ रुपये प्रती लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०७.८३ रुपये तर डिझेल ९७.४५ रुपये प्रती लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर १०२.०८ रुपये तर डिझेलचा दर ९३.०२ रुपये प्रती लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल शंभर रुपयांवर आहे. इथे पेट्रोलचा दर १०२.४९ रुपये लिटर तर डिझेल ९४.३९ रुपये लिटर आहे.

मध्यप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिसा, जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे. याशिवाय, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरसारख्या मोठ्या शहरात आधीच पेट्रोल शंभर रुपयांवर आहे. पेट्रोल-डिझेलचा दर आपल्याला एसएमएसवरही उपलब्ध होऊ शकतो. इंडियन ऑईलने वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, मोबालईलवरुन RSP असा संदेश आणि आपल्या शहराचा कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा. दररोज सकाळी सहा वाजता नवे दर जाहीर केले जातात. पेट्रोल, डिझेलच्या दरात एक्साईज ड्युटी, डिलर कमिशन आणि इतर गोष्टींचा समावेश केल्यानंतर हे दर जवळपास दु्पट होतात. पेट्रोलियम कंपन्या दररोज आंतरराष्ट्रीय बाजारातील दरानुसार आपल्या दरात त्याची सुधारणा करतात.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here