ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी टोल फ्री कॉल सेंटर सुविधा

101

पीलीभीत : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी त्वरीत आणि गतीने सोडविण्यासाठी राज्याचे ऊस आणि साखर आयुक्त संजय भुसरेड्डी यांनी मुख्यालयात टोल फ्री कॉल सेंटरची स्थापना केली आहे. कॉल सेंटरवर शेतकऱ्यांनी फोन केल्यास ऊसाशी संबंधित समस्या सोडविल्या जातील. याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात एलएच साखर कारखाना पिलीभीत, दि किसान सहकारी साखर कारखाना पूरनपूर, दि किसान सहकारी साखर कारखाना विलासपूर आणि बजाज हिंदुस्थान लिमिटेड बरखेडा हे साखर कारखाने सुरू आहेत. ऊसाचे एक लाख सहा हजार हेक्टरमध्ये लागण करण्यात आली होती. जिल्ह्यात एकूण १,७३,२८६ ऊस उत्पादक शेतररी आहेत. ते साखर कारखान्यांना ऊसाचा पुरवठा करतात.

जिल्ह्यात सात मेपासून उसाचे सर्वेक्षण सुरू आहे. ३० जूनपर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. ऊस तथा साखर आयुक्त संजय भुसरेड्डी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यालयात टोल फ्री कॉल सेंटरची स्थापना केली आहे. त्याचा टोल फ्री क्रमांक १८००-१२१-३२०३ आहे. दोन टप्प्यांत शेतकऱ्यांना सुविधा दिली जाईल. ऊस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, सकाळी पावणेआठ वाजल्यापासून रात्री पावणे अकरा वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून त्याची सोडवणूक केली जाईल. ही व्यवस्था सर्व्हेच्या कालावधीपासून, जून ते सप्टेंबर अशी राहील. टोल फ्री क्रमांकावर शेतीशी संबंधीत समस्यांचे निवारण केले जाईल. सर्व्हे, कॅलेंडर, तोडणी पावती अशा सर्व समस्यांबाबत १८००-१०३-५८२३ हा टोल फ्री क्रमांक दिला आहे. शेतकऱ्यांना ऊस विभागाच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. टोल फ्री क्रमांकावरून जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळेल.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here