आज सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्य़ाप्तीने 219.53 (2,19,53,88,326) कोटीचा टप्पा पार केला आहे. 16 मार्च 2022 पासून 12 ते 14 वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 4.12 कोटीहून (4,12,27,878) अधिक किशोरांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, 18-59 वयोगटातील नागरिकांना कोविड-19 खबरदारीचा लसमात्रा देण्यास 10 एप्रिल 2022 पासून सुरूवात झाली.
भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 24,043 इतकी आहे. तर उपचाराधीन रूग्णांचे प्रमाण एकूण रूग्णसंख्येच्या 0.05 टक्के इतके आहे.
परिणामस्वरूप, भारतातील कोविडमुक्त होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.76 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासांत, 3,102 रूग्ण कोविडमुक्त झाले असून कोविडमुक्त रूग्णांची एकत्रित संख्या (कोविड महासाथ सुरू झाल्यापासून) आता 4,40,87,748 इतकी आहे.
गेल्या 24 तासांत, 2,112 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासांत, 2,09,088 कोविड-19 चाचण्या भारतात पार पडल्या असून एकत्रित चाचण्यांची संख्य़ा आतापर्यंत 89.98 कोटी (89,98,36,516) इतकी आहे.
देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.97 टक्के इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 1.01 टक्के आहे.
(Source: PIB)