आत्मनिर्भरतेच्या दिशेने: पंजाबमधील साखर कारखाने करणार इथेनॉलचे उत्पादन

चंदीगड: पंजाबमध्ये आता साखर कारखाने साखरेच्या उत्पादनासह इथेनॉलचे उत्पादन करणार आहेत. सरकारने साखर कारखान्यांना आत्मनिर्भर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. साखर उत्पादन करणाऱ्या कारखान्यांमध्ये इथेनॉल, सहवीज प्रकल्प, बायो सीएनजी आणि रिफाईंड शुगर प्रोजेक्टमध्ये बदलण्यासाठी सरकारने योजना तयार केली आहे. लवकरच याचे सकारात्मक परिणाम दिसू शकतील.

गुरुदासपूर आणि बटाला येथील नवीन शुगर प्लांट आणि डिस्टिलरी स्थापन करण्यास सुरुवात झाली आहे. सहकारी साखर कारखान्यांना आत्मनिर्भर आणि ऊर्जेच्या नवस्त्रोतांना प्रोत्साहन देण्यासाठी गाळपानंतर उर्वरीत उसाच्या प्रेस मडपासून ग्रीन एनर्जी उत्पादनासाठी सहकार विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी अलिकडेच खासगी सार्वजनिक भागीदारीच्या अंतर्गत साखर कारखान्यांमध्ये बायो सीएनजी निर्मिती योजना सुरू करण्यात येणार आहे.

को जनरेशन, बायो उत्पादन, इथेनॉल या माध्यमातून वार्षिक एक कोटी ते ७५ लाख रुपये कमाईची योजना आहे. त्यातून सहकारी साखर कारखाने उसाच्या इतर उत्पादनांसह ग्रीन एनर्जी मध्ये विस्तारीकरण करतील. उसाच्या प्रेस मडशिवाय पोल्ट्री फार्म, भाजीपाला आणि फळांच्या उर्वरीत अवशेषांपासून बायो सीएनजी गॅसचे उत्पादन होईल. यातून अधिक रोजगार संधी मिळणार आहेत. शेतकऱ्यांनाही याचा फायदा होईल असे सहकार मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here