वारी येथे उसाचा ट्रॅक्टर ट्रेलर गोदावरी नदीत कोसळला

कोपरगाव : साखर हंगाम मध्यापर्यंत पोहोचला असून, आता पर्यंत बरेच साखर कारखाने बंद सुद्धा झाले आहेत. उसाची वाहतूक करताना शेतकर्यांना बऱ्याच अडचणींना टोंफ द्यावे लागते अशीच एक घटना कोपरगाव तालुक्यात वारी येथे घडली, येथील गोदावरी नदीच्या पुलावरून ऊसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलर शुक्रवारी संध्याकाळी गोदावरी नदीत कोसळला. या अपघातात कुठलीही जिवीतहानी झाली नसली तरी यात ट्रॉलीचे व शेतक-याच्या उसाचे मोठे नुकसान झाले आहे.

साखर कारखान्यांमध्ये ऊसाचे गाळप सुरु आहे. गाळपासाठी ऊस तोडून तयार आहे. या उसाची शेतातून कारखान्यापर्यंत वाहतूक करण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर केला जातो. पूर्वीच्या काळात बैलांद्वारे वाहतूक करण्यासाठी टायर गाडी वापरात असे. तिलाच डल्लम असे म्हणत. यंदा मात्र ऊस वाहतूक करणा-या चालकांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्याच डल्लमची वाहतूक क्षमता वाढवून त्याला बैलाऐवजी ट्रॅक्टर जोडला आहे.

हा ऊसाचा ट्रेक्टर टेलर नदीत कोसळून जिवित हानी झाली नसली तरी, ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here