रेल्वेच्या म्हैसूर विभागाकडून साखर, मक्क्याची वाहतूक सुरू

79

म्हैसूर : दक्षिण रेल्वेच्या म्हैसू विभागाने आता ऑटोमोबाईल शिवाय साखर आणि मक्क्याची वाहतूक सुरू केली आहे. रेल्वे मंत्रालयाने याबाबत गेल्या आठवड्यात ट्विट केले होते. या ट्वीटमध्ये म्हटले होते की, पहिल्यांदाच २,६६१ टन साखर म्हैसूर विभागातील नंजनगुडमधून न्यू मंगळुरुपर्यंत वाहतुकीसाठी लोड करण्यात आली आहे.

यासंदर्भात द हिंदूमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, गुरुग्रामस्थित एका निर्यातदारांनी इंडोनेशिया आणि बांगलादेश येथे निर्यातीसाठी बनारी अम्मान साखर कारखान्याकडून साखर वाहतुकीसाठी रेकचे बुकिंग केले आहे.

नंजगुडमधून मंगळुरू बंदरापर्यंत २६५० टन साखर १२ रॅकमधून नेण्यात येत आहे. रेल्वेच्या सुत्रांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, नेहमी साखर ट्रकमधून रस्ता वाहतुकीद्वारे आणि कधीकधी रेल्वे मालगाडीतून तुतीकोरीनपर्यंत नेण्यात येते. मात्र, आता पहिल्यांदाच रेल्वेमधून मंगळुरूसाठी ही साखर लोड करण्यात आली आहे. साखरेशिवाय दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या म्हैसूर डिव्हिजनही राणीबेन्नूर आणि हावेरीमधून केरळ आणि तामिनळाडूसह पश्चिम बंगाल, बिहारच्या काही भागात पोल्ट्री फिडची गरजभागविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मक्क्याची वाहतूक करीत असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here