त्रिवेणी इंजिनीअरिंग अँड इंडस्ट्रिजचे इथेनॉल क्षमता विस्तारावर लक्ष केंद्रीत

नवी दिल्ली : त्रिवेणी इंजिनीअरिंग अँड इंडस्ट्रिजच्या बोर्डाने कंपनीच्या इंजिनीअरिंग सेगमेंटसाठी कोणत्याही डीमर्जरबाबत विचार केलेला नाही असे कंपनीचे व्हाइस चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक तरुण साहनी यांनी CNBC-TV18 ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. तरुण साहनी म्हणाले की, त्रिवेणी इंजिनीअरिंग अँड इंडस्ट्रिजची आपल्या इंजिनीअरिंग व्यवसाय स्वतंत्र करण्याची कोणतीही योजना नाही.

ते म्हणाले की, कंपनीच्या बोर्डाने आमच्या कोणत्याही व्यवसायाला वेगळे करण्याबाबत विचार केलेला नाही. वस्तूतः आमच्या इतिहासात पहिल्यांदा आम्ही इंजिनीअरिंग व्यवसाय PBIT (profit before interest and tax) वर्षासाठी १०० कोटी रुपयांच्या वर पोहोचला आहे. मात्र, डीमर्जरची कोणतीही योजना नाही. त्रिवेणी इंजिनीअरिंग अँड इंडस्ट्रीज सक्रिय रुपात आपल्या इथेनॉल क्षमता विस्ताराबाबत लक्ष केंद्रीत करू इच्छित आहे.

कंपनीला FY२३-२४ मध्ये आपली इथेनॉल उत्पादन क्षमता २१ कोटी लिटरपर्यंत पोहोचविण्याची अपेक्षा आहे, या गोष्टीवर साहनी यांनी प्रकाशझोत टाकला. त्रिवेणी FY२५ पर्यंत आपली इथेनॉल उत्पादन क्षमता ३१ कोटी लिटरपर्यंत वाढवू इच्छित आहे. ते म्हणाले की, हा धोरणात्मक निर्णय इथेनॉल उत्पादनाच्या क्षमतेचा फायदा घेऊन अक्षय ऊर्जा क्षेत्रात योगदान देण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here