मुरादाबाद : रानी नागल येथील त्रिवेणी साखर कारखान्यातील ऊस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतांची पाहणी केली. शेतात वेळेवर खुरपणी केल्यास पिक चांगले येईल असे त्यांनी सांगितले. कारखान्याचे व्यवस्थापक आनंद सिन्हा, ऊस अधिकारी योगेश पांडे, शेतकरी यशपाल सिंह, ओमकार सिंह, योगेंद्र सिंह आदींनी मौजा साहबगंज येथील ऊस शेतीची पाहणी केली. शेतकऱ्यांना ऊसाच्या चांगल्या उत्पादनानसाठी वेळेवर सिंचन, भांगलण, औषधे तसेच किटकनाशक फवारणी करावी यासाठी त्यांनी आवाहन केले.
याबाबत लाइव्ह हिंदूस्थान डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, ऊस विभागाच्या वरिष्ठ व्यवस्थापकांनी सांगितले की, काही ठिकाणी ऊसावर टॉप बोरर किडीचा फैलाव दिसत आहे. आता कोराजनची फवारणी करणे गरजेचे आहे. साखर कारखान्याचे अप्पर महाव्यवस्थापक टी. एस. यादव म्हणाले की, ज्या काही थोड्या शेतकऱ्यांकडे अद्याप चालू हंगामातील ऊस शिल्लक असेल, त्यांनी तो तातडीने गाळपासाठी पाठवावा. त्यानंतर सत्र समाप्ती केली जाणार आहे. सर्व शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे २५ एप्रिलपर्यंत त्यांच्या बँक खात्यावर पाठवण्यात येतील. कारखाना बंद झाल्यानंतर लगेच शेतकऱ्यांचे पैसे अदा करण्याचे प्रयत्न आहेत. यावेळी शेतकरी नेते प्रीतम सिंह यांनी मुरादाबाद ऊस विकास सहकारी समितीकडे एका लिपिकाची नियुक्ती करावी अशी मागणी अप्पर महाव्यवस्थापकांकडे केली. शेतकऱ्यांना छोट्या कामांसाठी मुरादाबाद समितीकडे वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत.