युगांडा साखर उद्योग उध्वस्त होण्याच्या उंबरठयावर, सरकार कडुन हस्तक्षेपाची मागणी

105

कम्पाला : बुसोगा उप-क्षेत्र मध्ये एक आठवड्यापेक्षा कमी वेळेत ऊसाच्या किंमतीमध्ये प्रति टन Shs104,000 ते Shs99,000 पर्यंत सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे ऊस शतकरी चिंतेत आहे. जुलैच्या मध्यात कारखानदारांनी Shs110,000 ते Shs104, 000 पर्यंत ऊसाच्या किंमती कमी केल्या आहेत. बुसोगा केन गोअर्स एसोसिएशन चे प्रवक्ता गॉडफ्रे नितेमा यांनी सरकार ला सांगितले की, जर सरकारला साखर उद्योगाला जिवंत ठेवायचे असेल तर त्यांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागेल. ते म्हणाले, कारखानदार म्हणत आहेत की, साखरेच्या निर्यातीवर प्रतिबंध असल्याने त्यांची विक्री कमी झाली आहे, यासाठी सरकारला साखर उद्योग उध्वस्त होण्यापूर्वी हस्तक्षेप करावा लागेल.

नितेमा म्हणाले, किमती कमी करणे हे समस्येच समाधान नाही. सरकारला इतर देशांप्रमाणे साखर उद्योगाला सुरक्षा देण्यासाठी अतिरिकत साखरेची खरेदी आणि स्टॉक करावा लागेल. असे नसेल, तर आम्ही कारखान्यांना पुरवण्यात येणारा ऊस बंद करु कारण आमचे नुकसान होत आहे. युगांडा साखर उत्पादक संघाचे अध्यक्ष जिम कबाहो म्हणाले, साखर विक्रीतील घसरणीमुळे ऊसाच्या किमती कमी होत आहेत. ते म्हणाले, आम्ही पूर्वी अफ्रीकी देशांमध्ये साखर निर्यात करत होतो, पण युगांडा सारख्या अधिकांश देशांनी यावर प्रतिबंध लावला आहे. ऊस आणि साखर दोन्ही साठी मोठी बाजारपेठ असणाऱ्या केनियानेही आयात बंद केली आहे. साखर कारखान्यांमध्ये अतिरिक्त साखर पडून आहे.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here