TruAlt Bioenergy आशियातील सर्वात मोठी इथेनॉल उत्पादक कंपनी बनण्यास तयार

नवी दिल्ली : जगभरात जसजसा पारंपरिक इंधनाकडून इथेनॉलसारख्या नाविन्यपू्र्ण आणि टिकाऊ इंधनाकडे प्रवास सुरू झाला आहे, इथेनॉल उत्पादन क्षेत्रात काम करणारी TruAlt Bioenergy ही आशियातील सर्वात मोठी इथेनॉल उत्पादक कंपनी होण्यास सज्ज झाली आहे. कंपनीची उत्पादन क्षमता प्रती दिन जवळपास २,००० किलो लिटर आहे.

ईटी नाऊ लिडर्स ऑफ टुमोरो (एलओटी) अवॉर्ड्समध्ये बोलताना, TruAlt Bioenergyचे संस्थापक आणि एमडी, आणि MRN Group चे एमडी विजय निरानी यांनी सांगितले की, भारतातील इथेनॉल पुरवठ्यामध्ये जवळपास ७ टक्के योगदान त्यांचे आहे. ते म्हणाले की, इथेनॉल आमच्यासाठी खूप मोठे गेमचेंजर ठरले आहे. आता आमच्याकडे केवळ एक साखर कारखानाच नाही तर आमच्याकडे बायोएनर्जी पार्क आहे.

त्यांनी सांगितले की, TruAlt Bioenergy देशातील त्या पहिल्या अशा कंपन्यांपैकी एक बनणार आहे की, जी खासगी स्तरावर २ जी इथेनॉल उत्पादन करणार आहे. आम्ही मोठ्या उद्योगांसमवेत धोरणात्मक भागिदारी करीत आहोत, की ज्यांनी आधीच परदेशात २ जी इथेनॉल प्लांट स्थापन केले आहेत. २ जी इथेनॉलशिवाय, TruAlt Bioenergy आयसो ब्युटेनॉलचेही उत्पादन करीत आहे. हे तरल उत्पादन मोलॅसिसपासून तयार होते. मोलॅसीस हे उसाचे उप उत्पादन आहे. हा सर्वात मोठा कच्चा माल टिकावू विमान इंधन बनवतो.

साखरेपासून इथेनॉल उत्पादनाच्या आपल्या कंपनीच्या बदलांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, सरकारची यासाठी असलेली धोरणे ही फायदेशीर असल्याचे सिद्ध होत आहे. गेल्या काही वर्षांपासून आमच्याकडे अनेक चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत. आम्ही अशा एका कृषी आधारित उद्योगाशी जोडले गेला आहोत, ज्यामध्ये ऊस हे प्राथमिक उत्पादन आहे. निरानी यांनी सांगितले की, आता सरकारने आणलेल्या धोरणांचा लाभ मिळण्यासह कच्च्या तेलाच्या कमतरतेमुळे जागतिक हरित ऊर्जा, टिकाऊ ऊर्जेचा पर्याय या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here