साखर घेऊन जाणारा ट्रक गायब

कन्नड – कर्नाटकातील एका साखर कारखान्यातून गुजरात राज्याकडे १० लाख रुपये किमतीची साखर घेऊन निघालेला ट्रक निश्चित स्थळी पोचलाच नाही. इतकया किमतीची साखर रस्त्यातच गायब झाला. त्यामुळे ट्रक चालक आणि मालकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.

ट्रान्स्पोर्ट मालक ओंकारसिंग तारासिंग पन्नु ( रा. उस्मानपुरा, औरंगाबाद ) यांनी आरोपी ट्रक मालक प्रितपाल सिंग पंजारत व ट्रकचालक नरेंद्र यादव यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोनि. रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनि. बलभीम राऊत करीत आहेत.

या बाबत अधिक माहिती अशी की, दि. १४ फेब्रुवारी ला बारामती अॅग्रो युनिट २ या साखर कारखान्यातुन एम ३० साखरेची २५० क्विंटल वजन असलेली पाऊच ट्रक ( क्र.सीजी-०४ जेडी -९८४४ ) मध्ये भरण्यात आली. ही साखर गुजरात येथील रिलायन्स रिटेल लिमीटेड येथे रवाना करण्यात आली. हा ट्रक दि. १७ फेब्रुवारी रोजी नियोजित स्थळी पोहोचणे आवश्यक होते. तथापी ट्रक नियोजित स्थळी पोहोचलाच नाही. उलट दि. १७ पासून ट्रक मालक प्रितपालसिंग पंजारत व ट्रकचालक नरेंद्र यादव दोघे ( रा. रायपुर, छत्तीसगड ) यांचे मोबाईल बंद आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here