साखर कारखान्यांत कोविड लसीकरणाशिवाय ट्रकचालकांना प्रवेश बंदी

कोविड लसीकरणाबाबत आता जनजागृती दिसून येत आहे. अनेक ठिकाणी कोविड लसीकरण केलेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जात आहे. अनेक साखर कारखान्यांमध्येही आता लोकांना प्रवेश करण्यासाठी कोविड विरोधी लसीकरण करणे बंधनकारक असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

डीसीएम श्रीराम लिमिटेडच्या उत्तर प्रदेशातील हरियावा युनिटमध्ये ट्रक ड्रायव्हर्स, क्लिन्नरना ३० जुलै २०२१ रोजी परिसरात प्रवेश करण्याबाबत पत्र जारी करण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, ड्रायव्हर आणि क्लिन्नरना कारखान्याच्या यार्डमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कोविड लसीकरण प्रमाणपत्र दाखवणे गरजेचे आहे. जर लस घेतलेली नसेल तर एका आठवड्याच्या आता लस घेणे अनिवार्य आहे.

एका आठवड्यानंतर कंपनीच्या नियमांनुसार जर चालक, वाहकाने लस घेतलेली नसेल तर त्यांना प्रवेश दिला जाणार नाही आणि ट्रकही रोखले जातील. ट्रकचालकांच्या प्रवेशाच्या ठिकाणी चालक, वाहकांना कोविड लसीकरण प्रमाणपत्राची नियमित तपासणी केली जाणार आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here