ऊसाची वाहतुक करणार्‍या ट्रक मालकांनी केली प्रलंबित देय भागवण्याची मागणी

पोंडा, गोवा : गोव्यातील शेतकर्‍यांनी कर्नाटकातील खानापूरमध्ये असणार्‍या लैला साखर कारखान्याला अलीकडेच संपलेल्या गाळप हंगामात ऊसाचा पुरवठा केला होता. कारखान्याकडून शंभर टक्के देय अजूनही दिलेले नाही. दरम्यान, गोव्यातील शेतकर्‍यांच्या ऊसाची वाहतुक करणार्‍या ट्रक मालकांची बाकी अजूनही देय आहे. लैला साखर कारखान्यामध्ये ऊस पोचवणार्‍या ट्रक मालकांनी गोवा सरकारकडून शेवटच्या टप्प्यातील देय भागवण्याची आग्रही मागणी केली आहे.

सांगेम मैस्केरनहस च्या शेतकरी संघटनेच्या सदस्याने इतर सदस्यांबरोबर या मुद्दयावर चर्चा केल्यानंतर सोमवारी संजीवनी साखर कारखान्यामध्ये एक बै़ठक आयोजित केली आहे. ट्रक मालकांनी सागितले की, गोव्यातील जवळपास 22 ट्रक उसाच्या वाहतुकीसाठी वापरले गेले होते, ज्यापैकी जवळपास 12 ट्रक मालक सांगेम क्षेत्रातील आहेत. या ट्रक मालकांनी गणेश चतुर्थी पूर्वी सरकारकडून देय भागवले जाण्याचा आग्रह केला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here