भारत ऊर्जा सप्ताहामध्ये ट्रुएल्ट बायोएनर्जीच्यावतीने जैव इंधन क्षेत्रात नवा मानदंड प्रस्थापित

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडे बेंगळुरूमध्ये भारत ऊर्जा सप्ताह २०२३ अंतर्गत देशाच्या महत्त्वाकांक्षी ई २० इथेनॉल मिश्रण उद्दिष्टास सुरुवात केली. हा निर्णय भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील मैलाचा दगड ठरला आहे. आणि याचा अर्थव्यवस्था, शेतकरी तसेच पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव पडेल.

भारताची सर्वात मोठी बायोफ्यूएल कंपनी आणि आशियातील इथेनॉलची सर्वात मोठी उत्पादक ट्रूएल्ट बायोएनर्जीचे व्यवस्थापकीय संचालक विजय निरानी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कार्यक्रमास उपस्थिती लावली. आशियात इथेनॉलच्या प्रमुख उत्पादकांच्या रुपात ट्रुएल्ट बायोएनर्जीने मोठे योगदान दिले आहे. आणि ते यापूर्वीच आपले उद्दिष्ट पूर्ण करु शकले आहेत. ट्रुएल्ट बायोएनर्जीने स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जा स्रोतांच्या वापरास प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना मोलाची मदत केली आहे.

ई २० इथेनॉल लाँचच्या कार्यक्रमावेळी पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री, हरदीप सिंह पुरी हेसुद्धा उपस्थित होते. उद्घाटन समारंभात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी उज्ज्वल भविष्याच्या दिशेने भारताच्या वाटचालीत ट्रूएल्ट बायोएनर्जी आणि विजय निरानी यांच्या योगदानाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारचा हा निर्णय नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांना प्रोत्साहन देणे, विदेशी तेलावरील देशाचे अवलंबीत्व कमी करणे आणि अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमआणात परकीय चलनाची बचत करण्यास कटीबद्धता दर्शविते. यासोबतच भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला महत्त्वपूर्ण प्रोत्साहन मिळेल आणि कृषी अर्थव्यवस्था खूप मजबूत होईल.

टाइम्स नाऊसोबत बोलताना एमआरएन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक विजय निरानी यांनी सांगीतले की, इथेनॉल केवळ आपल्या देशासाठीच गेम चेंजर ठरणार नाही तर स्वच्छ ऊर्जा आणि हरित रुपात भारताच्या उत्पादनाच्या बाबतीत खूप महत्त्वाचा ठरणार आहे. इथेनॉल आणि अशाच प्रकारचे जैव इंधन आता वास्तविकता बनले आहे. भारत सरकारच्या दूरदर्शी धोरणे, सक्रिय पावलांमुळे आम्हाला विश्वास वाटतो की, भारत जैव इंधन उत्पादकाच्या रुपात जागतिक नेतृत्व करेल.

विजय निरानी म्हणाले की, इथेनॉलच्या वापराने पर्यावरणावरही सकारात्मक प्रभाव पडेल. इथेनॉल पारंपरिक जीवाश्म इंधनाच्या तुलनेत ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन खूप कमी करण्यास उपयोगी ठरेल. याशिवाय हवामान बदलाचे प्रभाव कमी करणे आणि भारताच्या स्थायी भविष्याला प्रोत्साहन देण्यास मदत मिळेल. याशिवाय इथेनॉलचे उत्पादन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पिकांची वाढती मागणी कृषी क्षेत्राला पाठबळ देईल. त्यातून शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल.

ते म्हणाले की, E२० इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी खूप आव्हानांचा सामना करावा लागेल. वाढती मागणी पूर्ण करण्यातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे इथेनॉल उत्पादन वाढवावे लागेल. सद्यस्थितीत भारत वर्षभरात ४ बिलियन लिटर इथेनॉल उत्पादन करीत आहे. ई २० चे उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक असलेल्या २० बिलियन लिटरच्या तुलनेत हे उत्पादन खूप कमी आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उत्पादन वाढवणे आणि खर्च कमी करण्यासाठी नव्या तंत्रांच्या विकासासह इथेनॉल उत्पादन उद्योगातील गुंतवणूक खूप महत्त्वाची असेल.

या आव्हानांनंतरही E२० इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट भारतासाठी एक खूप मोठी संधी देत आहे. इंधनाच्या रुपात इथेनॉल वापराने आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. यातून परकीय चलनांचा वापर कमी होईल. यापासून भारतीय अर्थव्यवस्थेला महत्त्वपूर्ण वाढ मिळेल. आणि कृषी अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी मदत मिळेल. इथेनॉल उत्पादन करण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या पिकांची वाढती मागणी कृषी क्षेत्रासाठी प्रोत्साहन देणारी ठरेल. यातून शेतकऱ्यांच्या उपजिविकेस मदत मिळेल.

पंतप्रधान मोदी यांच्याद्वारे निर्धारीत E२० इथेनॉल मिश्रण उद्दिष्टामध्ये ही सर्वात मोठी उपलब्धी आहे. आशियामध्ये इथेनॉलच्या सर्वात मोठ्या उत्पादकांच्या रुपात ट्रुएल्ट बायोएनर्जी यामध्ये सर्वात महत्त्वाची योगदान देणारी असेल आणि भारतात स्वच्छ, नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांचा वापरास प्रोत्साहन दिले जाईल. या निर्णयामुळे अर्थव्यवस्था, शेतकरी, पर्यावरणास खूप लाभ मिळेल. आणि भारत बायोएनर्जीच्या क्षेत्रात अग्रेसर रुपात विकसित होईल. पुढील आव्हाने महत्त्वपूर्ण आहेत. मात्र, ती पार पडण्याच्या शक्यता अधिक आहेत. सरकार खासगी क्षेत्र आणि भारताच्या लोकांच्या समर्थनासाठी ई २० इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठेल. देशासाठी एक उज्ज्वल आणि टिकावू भविष्य तयार होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here