पाच राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले

नवी दिल्ली : भारत निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक ९ ऑक्टोबर रोजी जाहीर केले. त्यानुसार मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबरला, राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबरला, छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबरला, तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला आणि मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणामध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, या पाच राज्यांमध्ये 60.2 लाख नवीन मतदारांची भर पडली आहे. पुरूष मतदारांची संख्या 8.2 कोटी आणि महिला मतदारांची संख्या 7.8 कोटी आहे. ते म्हणाले,  2900 मतदान केंद्रांचे व्यवस्थापन तरुणांकडून केले जाईल. एकूण 17,734 मॉडेल मतदान केंद्रे असतील. 621 मतदान केंद्रे PWD कर्मचारी आणि 8,192 केंद्रांचे व्यवस्थापन महिला करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here