वाढत्या किमती रोखण्यासाठी तुर्कस्तान करणार ४,००,००० टन साखर आयात

अंकारा : देशांतर्गत बाजारपेठेतील वाढत्या किमती रोखण्यासाठी तुर्कस्तानने ४,००,००० टन साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. साखर आयातीबाबत जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की, आयात केल्या जाणाऱ्या ४ लाख टन साखरेवर कोणतेही सीमाशुल्क लावले जाणार नाही. नव्या निर्णयांतर्गत दिले जाणारे परवाने १५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत वैध असतील.

सरकारने सांगितले की, ज्या कंपन्या आपल्या उत्पादनात साखरेचा वापर करतात, अशा कंपन्यांना आयात कोटा मंजूर करण्यात येणार आहे. तुर्कस्तानमध्ये साखरेच्या किमतीत जोरदार वाढ झाली आहे.

कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या कंपन्या आपल्या उत्पादनात साखरेचा वापर करतात, त्यांना बाजारातील दर स्थिर करण्यासाठी आणि इतर प्रकार रोखण्यासाठी आयात कोटा मंजूर केला जाईल. तुर्कस्तानमध्ये दर महिन्याला जवळपास २ लाख टन साखरेचा खप होतो. तर वार्षिक खप साधारणतः २.४५ मिलियन टन आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले, की सामान्यतः जानेवारी ते मे यांदरम्यान बाजारात १.४५ मिलियन टन साखरेची विक्री केली जाते. मात्र, यावर्षीची विक्री २० लाख टनापेक्षा अधिक झाली आहे.

ते म्हणाले की, साखरेच्या दरात झालेली वाढ ही मागणी वाढल्यामुळे झाली आहे. उत्पादक आणि ग्राहक हे दोन्ही घटक साखरेचा साठा करत आहेत. किमती अधिक वाढण्याची भीती त्यांना सतावत आहे. उत्पादकांकडे अद्याप ४ लाख टन साखर आहे. मात्र, प्रत्येकजण राज्याच्या मालकीच्या TürkŞeker कडून साखर खरेदी करू इच्छितो. कारण याची किंमत बाजारापेक्षा कमी आहे. Kayseri Sugar Beet Growers’ Cooperative चे प्रमुख हुसेन एके यांच्या म्हणण्यानुसार, साखरेचा दर 14,000 liras आणि 15,000 liras प्रती टन यांदरम्यान असायला हवा. मात्र सद्यस्थितीत हा दर 20,000 liras आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here