फास्टॅगमुळे बाराशे कोटीच्या इंधनाची बचत

160

नवी दिल्ली : टोल प्लाझांवर टोल भरण्यासाठी वाहनांच्या  लागणाऱ्या लांबच लांब रांगांमुळे दर वर्षी १२ हजार कोटी रुपयांचे इंधन वाया जात असल्याचे दिसून आले असून, ‘फास्टॅग’च्या वापरामुळे कोट्यवधींचे इंधन वाचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एक डिसेंबरपासून ‘फास्टॅग’चे स्टीकर न लावलेले वाहन ‘फास्टॅग’ लेनमधून गेले तर, संबंधित चालकाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे.

एक डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) टोलनाक्यांवर ‘फास्टॅग’ स्टीकरचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. एका अहलवालानुसार ४८८ राष्ट्रीय महामार्गांवर सरासरी वेटिंग टाइमचा सर्वे केला असता, त्यामध्ये गुरुवारी दुपारी २ वाजता १९९ प्लाझांवर वेटिंग टाइम ५ ते १० मिनिटे आणि ३२ प्लाझांवर वेटिंग टाइम १० ते २० मिनिटे असल्याचे आढळून आले आहे.

एक डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) टोल नाक्यांवर ‘फास्टॅग’ स्टीकरचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. एनएचएआयच्या दाव्यानुसार आजपर्यंत ७२ लाख ‘फास्टॅग’ची विक्री करण्यात आली आहे. मंगळवारी (२६ नोव्हेंबर) एकाच दिवशी १,३५,५८३ ‘फास्टॅग’ची विक्री झाली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here