ट्वेंटीवन शुगर्सचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात

लातूर : ट्वेंटीवन शुगर्स लि. मळवटी (लातुर) चा तृतीय गळीत हंगाम बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी व्हाईस चेअरमन विजयकुमार देशमुख, सरव्यवस्थापक संतोष बिराजदार, वर्क्स मॅनेजर सुभाष सुरवसे, पर्चेस मॅनेजर अनिल महेंद्रकर, को-जन मॅनेजर नितिन मोरे, चिप केमिस्ट सक्सेना,इंस्टूमेंट मॅनेजर मिसाळ, शेतकी अधिकारी उदय गायकवाड, एचआर मॅनेजर विजुकुमार पांचाळ व सर्व शेतकिरी अधिकारी व कामगार उपस्थित होते.

व्हाईस चेअरमन विजयकुमार देशमुख म्हणाले कि, ट्वेंटीवन शुगर्स शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. कारखाना व्यवस्थापनाने गाळप हंगामाची तयारी पूर्ण केली आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास ऊस दर देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here