साखर कारखान्यातून तार चोरणाऱ्या दोघांना अटक

231

बुलंदशहर : पन्नीनगर येथील वेव्ह शुगर मिलमधून कॉपर आणि तार चोरी करणाऱ्या दोघा तरुणांना सुरक्षा रक्षकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केली. पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे.

कोतवाली विभागातील वेव्ह शगर मिलच्या परिसरातील रहिवासी तथा एका बाहेरच्या युवकाने ४० किलो कॉपरची तार आणि इतर साहित्य चोरण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, सुरक्षा रक्षकांनी त्यांना चोरी करताना पाहून शिताफीने पकडले. त्यांनी तातडीने पोलिसांना फोन करुन याची माहिती दिली. पोलिसांनी अकबरपूरच्या मुश्रफ अश्रफअली यांच्या तक्रारीनंतर देवरिया जिल्ह्यातील भासपार विभागातील खेरसर तिवारी येथील अनिल बद्री प्रसाद आणि वेव्ह शुगर मिल पन्नीनगर परिसरातील यतेंद्र कुमार सुंदरसिंह (रा. पन्नीनगर, लोधी कॉलनी, बुलंदशहर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अखिलेश त्रिपाठी यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारावर त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here