साखर कारखान्यातील चोरीप्रकरणी मुद्देमालासह दोघे अटकेत

69

हाजीपूर : गोरौल साखर कारखान्यातून लोखंड चोरी करताना दोघा चोरट्यांना गोरौल पोलीस ठाण्यातील पथकाने पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर लोखंडी पाईप हस्तगत केले.

गोरौलचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील कुमार रजक यांनी याबाबतची फिर्याद नोंदवली आहे. गस्तीवरील पथकाला मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार, गोरौल साखर कारखान्यातून काहीजण लोखंड चोरून नेत असल्याचे समजले. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्यासचक गावाजवळ एक पिकअप गाडी दिसली. या गाडीची तपासणी केल्यावर त्यामध्ये लोखंडाचे सुमारे शंभर नग आढळून आले. पाईपबाबत कागदपत्रांची विचारणा केली असता चालकाकडे कोणतीच कागदपत्रे आढळली नाहीत. पोलिसांनी पिकअप गाडी जप्त केली आहे. याबाबत गोरौल गावातीलच राजा कुमार याच्यासह दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघांकडेही चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here