पुद्दूचेरीतील रेशन कार्डधारकांना लवकरच दोन किलो साखर : मुख्यमंत्री

पुद्दूचेरी : पुद्दूचेरीतील सर्व रेशन कार्डधारकांना मोफत दहा किलो तांदूळ आणि दोन किलो साखरेचे लवकरच वितरण केले जाईल असे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांनी सांगितले. पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेवेळी त्यांनी सांगितले की, यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. आधीच्या काँग्रेस-डीएमके सरकारच्या काळात लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये साखरेसाठी रोख पैसे दिले जात होते. आता एनआर काँग्रेस आणि भाजप सरकारने केंद्र सरकारच्या सहमतीने यात बदल केले असून रेशन दुकानांच्या माध्यमातून तांदूळ आणि साखर उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पुद्दूचेरीत रेशन दुकाने गेल्या तीन वर्षंपासून अधिक काळ बंद आहेत. प्रशासनाने केंद्र सरकारकडे ही दुकाने पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी मागितली होती. अलिकडेच राज्यपाल लेफ्टनंट डॉ. तमिलिसीई सुंदरराजन यांनी या फाइलला मंजुरी दिली. मात्र, तोपर्यंत दिवाळीचा सण समाप्त झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here