‘चिनीमंडी’ तर्फे उदगिरी शुगर अँड पॉवर लि. ला प्रतिष्ठेचा शुगर अँड इथेनॉल इंटरनॅशनल अवार्ड प्रदान

 नवी दिल्ली : देशाच्या साखर आणि इथेनॉल उद्योगातील अग्रगण्य संस्था असलेल्याचिनीमंडीसंस्थेकडून प्रतिष्ठेचा शुगर अँड इथेनॉल इंटरनॅशनल अवार्डस (Sugar and Ethanol International Awards / SEIA)  खानापूर (जि. सांगली) येथील उदगिरी शुगर अँड पॉवर लि. ला (Best Environment Friendly Sugar Mill)   प्रदान करण्यात आला.

2011 मध्ये डॉ. शिवाजीराव कदम यांनी स्थापन केलेल्या उदगिरी शुगर अँड पॉवर लि.चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून डॉ. राहुल शिवाजीराव कदम आणि पूर्णवेळ संचालक म्हणून उत्तम व्ही. पाटील हे महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. कारखान्याने आपली दैनंदिन गाळप क्षमता 5000 मेट्रिक टन आणि डिस्टिलरीचा 170 KLPD पर्यंत विस्तार करत साखर उत्पादन, को-जनरेशन आणि अक्षय ऊर्जा यावर लक्ष केंद्रित केले आहे. कारखाना प्रशासनाकडून प्रभावी CSR उपक्रम राबविले जात आहेत. कारखान्याच्या या दैदिप्यमान वाटचालीची दखल घेऊन साखर उद्योगातील प्रथितयश संस्था म्हणून ओळख असलेल्याचिनीमंडीया संस्थेने २०२४ च्या पुरस्कारासाठी निवड केली होती. 

 

या पुरस्कार वितरणावेळी ‘चिनीमंडी’चे  संस्थापक व सीईओ उप्पल शहा, हेमंत शहा, जे.के.ग्रुपचे संस्थापक जितुभाई शहा, नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव शुगर फॅक्ट्रीज लिमिटेड (NFCSF) चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाइकनवरे, संजय अवस्थी (अध्यक्ष, आईएसएससीटी परिषद आणि अध्यक्ष, द शुगर टेक्नोलॉजिस्ट एसोसिएशन ऑफ इंडिया (एसटीएआई), अतुल चतुर्वेदी (कार्यकारी अध्यक्ष, श्री रेणुका शुगर्स लिमिटेड), मुरुगेश  निरानी (संस्थापक, चेअरमन निरानी ग्रुप), अमित अग्रवाल (उपाध्यक्ष, बजाज हिंदुस्थान शुगर लिमिटेड), सुरेश अगरवाल (चेअरमन, रिका ग्लोबल इम्पेक्स लिमिटेड), प्रसाद घव्हाटे (संस्थापक- चेअरमन, राजगंगा बायोरिफायनरीज प्रायवेट लिमिटेड), महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ (MSCSF) चे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, हुसैन गंगार्धीवाला (सहायक संचालक, चीनी मंडी) यांच्यासह देशभरातील साखर उद्योगातील तज्ञ, मान्यवर उपस्थित होते.
seia award Udagiri Sugar

  ‘चिनीमंडीचे  संस्थापक व सीईओ उप्पल  शहा म्हणाले कि, साखर, इथेनॉल आणि संबंधित उद्योगांना सेवा देणारे देशातील सर्वात मोठे मिडिया आणि नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचीनीमंडीद्वारे  आयोजित साखर आणि इथेनॉलची सर्वात मोठी SEIC 2024 परिषद यशस्वीपणे पार पडली.  1  आणि 2 फेब्रुवारी 2024 रोजी एरोसिटी, नवी दिल्ली येथील हॉटेल अंदाज बाय हयात येथे पार पडलेल्या साखर आणि इथेनॉल इंडिया परिषदेच्या तिसऱ्या आवृत्तीला (3rd edition of the Sugar and Ethanol India Conference) साखर आणि इथेनॉल क्षेत्रातील जगभरातील तज्ञांनी उपस्थिती लावली होती.   

शहा म्हणाले की, मोठमोठ्या सरकारी अधिकाऱ्यांपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील साखर आणि व्यापार तज्ज्ञ, देशांतर्गत अभ्यासक, कृषी तज्ज्ञ असे प्रत्येकजण या दोन दिवसांत साखर, इथेनॉल आणि त्याच्या भविष्याबद्दल चर्चा करण्यासाठी एकत्र आले होते. SEIC 2024 साठी, प्रस्तुत प्रायोजक प्रतिष्ठित एमआरएन (निरानी) समूह आणि शीर्षक प्रायोजक केबीके समूह (रेणुका शुगर ग्रुप कंपनी) होता. परिषदेसाठी ५० पेक्षा जास्त कंपन्या प्रायोजकत्वासाठी एकत्र आल्या होत्या.  ‘चीनीमंडीतर्फे आयोजित या परिषदेमध्ये काही आघाडीच्या आणि सर्वोच्च संस्था, संघटनांनी सहयोगी भागीदार महत्वाची भूमिका पार पडली.  

 ते म्हणाले की, साखर, इथेनॉल आणि संबंधित उद्योगांमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेणे आणि त्यांचे कौतुक करणे हे SEIA अॅवॉर्डसचे उद्दिष्ट होते. देशातील काही संस्था आणि व्यक्तींनी साखर आणि इथेनॉल उद्योगांवर त्यांच्या मेहनतीची, योगदानाची दखल घेत त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 एकूण २८ श्रेणींमध्ये पुरस्कार वितरण…  

ऊस उत्पादक (शेतकरी), खाजगी कारखाने, सहकारी कारखाने, इथेनॉल उत्पादक, स्टँडअलोन डिस्टिलरीज, खांडसरी कारखाने, देशांतर्गत व्यापारी, आंतरराष्ट्रीय व्यापार घराणे, साखर किरकोळ विक्री श्रृंखला, लॉजिस्टिक कंपन्या, रेक ट्रान्सपोर्ट, सी&एफ एजंट, बँका, एनबीएफसी, ब्रँडेड साखर, घाऊक ग्राहक, बंदरे, साखर कारखाने पुरवठादार, अभियांत्रिकी कंपन्या, आंतरराष्ट्रीय व्यापारी (व्यक्ती), सामाजिक कार्यकर्ते, कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्ती, संपार्श्विक व्यवस्थापन, विमा कंपन्यालाइफटाइम अचीवमेंट अवार्ड, संशोधन गृहे आणि संस्था यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here