उडूपी : ऊस शेतीला प्राधान्य देण्याचे मंत्री शोभा करंदलाजेंचे आश्वासन

उडूपी : उडूपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यातील ऊस शेतीला सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल, आवश्यक ते पाठबळ दिले जाईल असे कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी सांगितले.

Daijiworld.com मध्ये प्रकाशिक झालेल्या वृत्तानुसार, ब्रह्मवर शुगर फॅक्ट्रीचे अध्यक्ष बैकाडी सुप्रसाद शेट्टी यांच्या आवाहनाला उत्तर देताना मंत्री शोभा करंदलाजे म्हणाल्या, शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी ऊस शेतीला प्राधान्य द्यावे लागेल. केंद्र सरकार लवकरच ब्रह्मवर साखर कारखान्यात इथेनॉल प्लांट सुरू करण्यास मंजुरी देईल. यासोबतच वेअर हाऊस, धान्य प्रक्रिया युनिटसह कृषी उत्पादनांवर आधारित पूरक उत्पादनांसाठी प्रोत्साहन देण्यात येईल.

यावेळी सुरेश नाईक, कोटाचे श्रीनिवास पुजारी, मंत्री के. प्रतापचंद्र शेट्टी, किरण कोडगी, भारतीय किसान संघ आणि रयत संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here