युगांडा : निर्यात शक्तीमध्ये साखरेच्या भावाचे पतन

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

उस आणि साखरेच्या किंमतीत पतन झाल्याने साखरेच्या निर्यातीत खंड पडला आहे. साखरेच्या किंमती प्रती टन 6.7 टक्क्यांनी घसरल्या आहेत. साखरेच्या 50 किलोच्या पिशवीमागे 41 टक्के घसरण झाली आहे. जिंजा जिल्ह्यामध्ये साखरेच्या रिटेल दरामध्ये प्रती किलो मागे 16 टक्क्यांनी घसरण झाली आहे. युगांडातील शुगर मॅन्युफॅर्क्ंचरर्स असोसिएशनचे प्रमुख मि. जिम कबाहो यांच्या मतानुसार, युगांडा रिवाडां सिमेवर साखर निर्यातीचा हा अनुभव रिवांडा सारख्या देशाच्या दृष्टीने आव्हानात्मक आहे. ही सिमारेषा फेब्रुवारी 2019 पर्यंत बंद राहिली होती. मि कबाहो म्हणाले, दक्षिण सुदान ची प्रजासत्ताक लोकशाही आणि बुरुंडी सारख्या शेजारच्या देशातही साखर अवरोधित आहे. तर दुसर्‍या बाजूला साउथ सुदान असुरक्षितेतेने ग्रस्त आहे. आणि या सार्‍याच परिणाम युगांडाच्या साखर निर्यातीवर होत आहे. उदाहरण देताना ते म्हणाले, त्यांची साखरेची वार्षिक मागणी प्रती वर्षी 15 हजार टन इतकी आहे आणि यासाठीची परवानगी मे आणि जुन मध्ये प्रत्येक वर्षी मिळते. पण यावर्षी, त्यांनी साखर निर्यातीला अधिक प्राधान्य दिले आहे. ही निर्यात साउथ आफ्रिकन डेव्हलपमेंट कम्युनिटी कडून होईल. ते म्हणाले, या महिन्यात चार कंपन्यांना 36 हजार मेट्रीक टन साखर विभागून निर्यात करण्याची परवानगी यावर्षी मिळाली आहे. या कंपन्यांना युगांडातील साखर नाही जाणार कारण टांझानिया सरकारने साखरेवर 25 टक्के सेवा कर लागू केला आहे.

युगांडाकडे 150 हजार मेट्रीक टन साखर अतिरिक्त स्वरुपात आहे. जर बाजारपेठा खुल्या झाल्या नाहीत तर याचा गंभीर परिणाम संपूर्ण साखर उद्योगावर होईल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. युगांडाचा निर्यात रेट 85 टक्क्यांनी कमी झाला आहे. जर रवांडा आणि बुरुंडी सिमा महिनाभर बंद राहिल्या तर दोन देशांमध्ये अर्थिक कुचंबणा होईल. मि कबाहो म्हणाले, आम्ही आमच्या घरगुती बाजारपेठेसाठी मार्गस्थ होणार. त्यांना साखरेवर कर नाही भरावा लागणार. हे मध्यवर्ती आणि उत्तर युगांडा मध्ये सामान्य आहे, म्हणूनच याचा परिणाम आमच्या विक्रीवर आणि साखरेच्या किमंतीवर होतो. एकदा साखरेची किंमत कमी झाली, उसाची किंमत कमी झाली. जर तुम्ही साखरेची किंमत कमी केली, तर तुम्हाला उसही कमी करावा लागणार. शेतकरी निरुत्साही यामुळे बुसोगा येथील उस उत्पादक शेतकरी सतत नुकसान सोसत आहेत.

कमी उस उत्पादनाचा फटका शेतकर्‍यांना 1 जुलैपासून बसणार आहे. शेतकर्‍यांनी उसाची किंमत कमी केली नाही तर आम्ही उस खरेदी थांबवणार. असे बुसोगा आउटग्रोवर असोसिएशनचे अध्यक्ष मि. इसा बुधूगो यांनी सांगितले. ते असेही म्हणाले की, जर चांगली किंमत मिळत असेल तर उस केनयाला निर्यात करणार. 2017 मध्ये 175 हजार टन उस उत्पादन होते ते त्याच वर्षी डिसेंबर मध्ये 155 हजार इतके कमी झाले. 2018 पासून कारखानदार 128 हजार टनउ स घेत होते ते आता 120 हजार टन इतके कमी झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here