केनियाविरुद्ध युगांडा ने साखर विवाद जिंकला

894

नैरोबी : चीनी मंडी

साखर निर्यातीवरून केनिया आणि युगांडा यांच्यात उठलेल्या वादात युगांडाने बाजी मारली आहे. अफ्रिका खंडातील इतर देशांना मोठ्या प्रमाणावर साखर निर्यात करण्याची क्षमता युगांडामध्ये असल्याचे आता केनियानेही मान्य केले आहे. त्यामुळे दोन देशांमध्ये आता सन्माननीय तोडगा निघाला आहे. त्यामुळे युगांडातून केनियाला साखर निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे.

केनिया आणि युगांडा यांच्यात साखर निर्यातीवरून २०१५पासून वाद सुरू होता. शेजारी देश युगांडामध्ये साखर निर्यात करण्याची क्षमता असल्याचे मान्य करण्यास केनिया तयार नव्हते. फेब्रुवारीमध्ये युगांडामधून निर्यात झालेली साखरही २०१८च्या तुलनेत ३० पट वाढल्याचे केनियाच्या साखर संचालनालयाने सांगितले आहे. तुलनेत केनियातून जानेवारी व फेब्रुवारीमध्ये झालेली निर्यात १२ हजार टन होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ४०० टनची तूट असल्याचे दिसते. केनियामध्ये स्थानिक पातळीवर साखर उत्पादन घटल्यामुळे व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर युगांडामधून साखर आयात करण्यास सुरुवात केली आहे.

या संदर्भात केनियाच्या साखर संचालनालयाचे प्रमुख सोलोमन ओडेरा म्हणाले, ‘साखरेचा २०१७पासून अतिरिक्त पुरवठा होत आहे. त्यामुळे ब्राझीलच्या स्वस्त साखरेमुळे नुकसान होण्याची भिती साखर व्यापाऱ्यांना होती. त्यामुळे २०१८ पासून व्यापारी ही साखर आयात करण्यास फारसे इच्छुक नव्हते.’

मुळात २०१५ पासून केनिया आणि युगांडा यांच्यात साखरेच्या व्यपारावरून युद्ध पेटले. युगांडामध्ये शेजारी देशांना साखर निर्यात करण्याची क्षमता आहे की नाही, यावरून दोन्ही देशांमध्ये वाद सुरू झाला. त्या पार्श्वभूमीवर द्वीपक्षीय समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीच्या निर्णयानुसार केनियाच्या शिष्टमंडळाने युगांडातील ११ साखर कारखान्यांना भेटी दिल्या. त्यानंतर २०१४-१५पासून युगांडाकडे दर वर्षी सरासरी ३६ हजार टन साखर अतिरिक्त असल्याचे आढळून आले.

या अतिरिक्त ३६ हजार टन साखरेपैकी ९ हजार टन दर तिमाहिला केनियाच्या बाजारात निर्यात करण्याला युगांडाकडून संमती देण्यात आली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये चांगले व्यापार संबंध प्रस्थापित करण्याविषयी सहमती झाली.

प्रक्रियायुक्त साखरेचा आयात

पूर्व अफ्रिकेतील देशांमध्ये तंत्रज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर डॉलरवर पाणी सोडावे लागत आहे. अनेक गोष्टी युरोपिय देशांमधून आयात कराव्या लागत आहेत. पूर्व अफ्रिकेच्या मंत्र्यांच्या परिषदेने देशांना प्रक्रिया युक्त शुद्ध साखर आयात करण्याची अनुमती दिली आहे. त्यासाठी अनुदानही देण्यात आले आहे. यामध्ये युगांडाला तीन लाख २४ हजार टन, केनियाला १९ हजार ७०० टन, बुरांडिला १ हजार टन तर, रवांडाला २३.४ टन साखर आयात करण्याची अनुमती देण्यात आली आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here