ऊसाला प्रति क्विंटल 400 रुपये दिले जावेत: काँग्रेसची मागणी

107

चांदपूर (उत्तर प्रदेश ): ऊसाला प्रति क्विटल 400 रुपये मूल्य देवून सरकारने ऊस शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एसडीएम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मंगळवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेरबाज पठाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते तहसीलदार कार्यालयात पोचले. यावेळी एसडीएम घनश्याम वर्मा यांना शेतकर्‍यांच्या 12 मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, शेतकर्‍यांना 14 दिवसांच्या आत ऊसाचे बिल दिले जावे. ऊसाला प्रति क्विंटल 400 प्रमाणे हे बिल दिले जावे. पीकांच्या सिंचनासाठी ओढ्यामध्ये पाणी असावे, मोकाट जनावरांची सोय करावी, जंगली प्राणी शेतात येवू नयेत याचा बंदोबस्त करावा, शेतकर्‍यांची कर्जे माफ करावीत, शेतकर्‍यांना विज, डीझेल वं खतावर सूट दिली जावी, नारनौर गंगा नदीवर नवनिर्मित पूल लवकर सुरु करावा यांसह अनेक मागण्या या निवेदनात नमूद केलेल्या आहेत.

यावेळी पोलिस अधिकारी राकेश कुमार श्रीवास्तव, रजा अस्करी रिजवी, तारिक मुस्तफा, हरज्ञान सिंह, इलियास कुरेशी, चंद्र सेनी आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here