कॅनडात उकाड्याचा १० हजार वर्षांतील उच्चांक, हीट डोममुळे दिवसात २३० जणांचा मृत्यू

क्यूबेक : कॅनडात सुरू झालेल्या हीट डोमने गेल्या दहा हजार वर्षातील उच्चांक तोडला आहे. ब्रिटीश कोलंबिया प्रांतामध्ये पारा ४९.४४ डिग्री सेल्सियसवर पोहोचला आहे. अत्यंतिक उष्णतेमुळे एका दिवसात २३० लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटीश कोलंबियाचे जॉन होर्गन यांनी यास दुजोरा दिला असून राज्यात उष्णता शिगेला पोहोचली असून २३० जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या रविवारी कॅनडाचे तापमान ११३ डिग्री फॅरनहाईट म्हणजेच ४५ डिग्री सेल्सिअरपेक्षा अधिक झाले नव्हते. तापमानाचा हा उच्चांक १९३७ मध्ये झाला होता. मात्र, आता १० हजार वर्षांत एकदा तयार होणाऱ्या हीट डोममुळे तापमान ४९ डिग्रीवर पोहोचले आहे. फक्त व्हॅन्कुअरमध्ये उकाड्याने ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. कॅनडाच्या हवामान विभागाने सांगितले की, ब्रिटिश कोलंबियाचा उच्चांक लास वेगासमध्ये नोंदविलेल्या उच्च तापमानापेक्षा अधिक आहे. ही उष्णतेची लाट अमेरिकेपर्यंत पसरली आहे. अमेरिकेत वॉशिंग्टन आणि ओरेगनमध्येही उच्चांकी तापमानाचा अनुभव येत आहे. अमेरिकन प्रसारमाध्यम सीबीएसच्या हवामान तज्ज्ञ जेफ बेरार्डेली यांनी सांगितले की, अशा प्रकारची घटना दहा हजार वर्षात एखाद्या वेळी घडते. बर्नाबी रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांचे कॅप्टन माइक कलांज यांनी सांगितले की, गेल्या २४ तासात लोकांच्या मृत्यूचे २५ फोनआ आले आहेत. लोकांनी आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांकडे मदत मागावी असे आवाहन करण्यात आले आहे.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here