युक्रेन : आतापर्यंत ५,६०,००० टन साखरेचे उत्पादन

कीव : युक्रेनच्या उक्रत्सुकोर नॅशनल असोसिएशन ऑफ शुगर प्रोड्यूसर्सने दिलेल्या माहितीनुसार युक्रेनने आतापर्यंत ५,६०,००० टन साखरेचे उत्पादन केले आहे. तर ४.२० मिलियन टन बीटवर प्रक्रिया करण्यात आली आहे. बीटवरील प्रक्रियेसाठी देशभरात २९ साखर रिफायनरी कार्यरत आहेत.

उक्रत्सुकोर नॅशनल असोसिएशन ऑफ शुगर प्रोड्यूसर्सने सांगितले की, यावर्षी युक्रेनमध्ये साखरेचा हंगाम अधिकृतरित्या २१ ऑगस्ट रोजी सुरू झाला आहे. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार युक्रेनमधील साखरेचे उत्पादन १.४ मिलियन टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. २०२० मध्ये युक्रेनचा साखर हंगाम ५ सप्टेंबर रोजी सुरू झाला होता. देशभरात ३० रिफायनरींतून साखर उत्पादन करण्यात आले होते. एकूण १.१ मिलियन टन साखर उत्पादन या हंगामात करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here