युक्रेन संकटाचा २०२२ मध्ये जागतिक व्यापार वाढीला फटका शक्य : डब्ल्यूटीओ

जिनेव्हा : रशिया आणि युक्रेन यांदरम्यान सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला गंभीर फटका बसला आहे. त्यामुळे २०२२ मध्ये जागतिक व्यापार वाढीचे आधीचे अनुमान ४.७ टक्क्यांवरून घटवून २.४ टक्के ते ३ टक्क्यांपर्यंत आले आहे. शिन्हुआ वृत्त संस्थेच्या अहवालानुसार जागतिक आर्थिक सिम्युलेशन मॉडेलवर आधारित डब्ल्यूएचओकडून सोमवारी याबाबत पत्र जारी करण्यात आले आहे. या मॉडेलनुसार, या जागतिक संकटात जागतिक सकल घरेलु उत्पादनाची वाढ ०.७-१.३ टक्क्यांपर्यंत कमी करायला हवा. त्यातून २०२२ साठी ३.१ टक्के आणि ३.७ टक्के यांदरम्यान असू शकते.

न्यूज नेशन टीव्ही डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, सचिवालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की खाद्य आणि ऊर्जेच्या किमती वाढल्या आहेत. रशिया आणि युक्रेनकडून निर्यात होणाऱ्या अनेक सामानाची टंचाईही निर्माण झाली आहे. निवेदनानुसार रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश खाद्य, ऊर्जेसह पायाभूत उत्पादनांचे निर्यातदार आहेत. २०१९ मध्ये दोन्ही देशांनी जागतिक गव्हाच्या २५ टक्क्यांहून अधिक निर्यात केली आहे. जागतिक सूर्यफूल उत्पादन निर्यातीमध्ये ४५ टक्के पुरवठा केला आहे. एकट्या रशियाचा जागतिक इंधनात ९.४ टक्क्यांचा वाटा आहे. तर नैसर्गिक गॅस निर्यातीत २० टक्क्यांचा वाटा या देशाचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here