यूक्रेनमध्ये आतापर्यंत 92,600 टन साखर उत्पादन

यूक्रेन मध्ये 2 ऑक्टोबर, 2020 पर्यंत 92,600 टन साखरेचे उत्पादन झाले आहे. देशामध्ये आता 15 साखर कारखाने सुरु आहेत, ज्यांनी 719,000 टन बीटाचे गाळप केले आहे. यूक्रेनमध्ये बीट गाळप हंगाम 5 सप्टेंबर ला सुरु झाला आहे.

देशामध्ये 2020 मध्ये 1.2 मिलियन टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे, जे एक वर्षापूर्वी च्या तुलनेत जवळपास 15 टक्के कमी आहे. बीटाचे एकूण क्षेत्र गेल्या वर्षाच्या 2,18,900 हेक्टरच्या आसपास आहे, आणि साखर उद्योगाला आशा आहे की, गेल्या वर्षाप्रमाणे या हंगामातही 33 साखर कारखाने सुरु होतील.\

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here