युक्रेनमध्ये ४,९२० टन साखर उत्पादन

कीव : युक्रेनमध्ये तीन सप्टेंबर २०२१ अखेर ४,९२० टन साखरेचे उत्पादन झाले आहे. नॅशनल असोसिएशन ऑफ शुगर प्रोड्यूसर्स उक्रत्सुकोर यांच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार सेलीशे साखर रिफायनगी आणि हैसिन साखर रिफायनरी सुरू झाली आहे.

देशात चालू हंगामात २१ ऑगस्टपासून बीटवरील प्रक्रिया सुरू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. अर्थ मंत्रालयाने युक्रेनमध्ये २०२१-२२ या आर्थिक वर्षात १.४ मिलियन टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ३० टक्के अधिक साखर उत्पादनाचा अंदाज आहे. देशांतर्गत साखरेची मागणी सुमारे १.२५ मिलियनटन असल्याचे सूत्रांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here