नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये तेजी दिसून येत आहे. कच्च्या तेलाचा दर 100 डॉलर प्रती बॅरलजवळ पोहोचले आहे. सद्यस्थितीत पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे सरकार आणि सरकारी तेल कंपन्यांनी नागरिकांना दिलासा दिला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून दर स्थिर आहेत. आजही, 23 फेब्रुवारी रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
भारतीय इंधन वितरण कंपन्या कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून असल्याचे सांगतात. कच्च्या तेलात किरकोळ दरवाढ झाली तरी इंधन दरवाढ करुन सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले जाते. मात्र, निवडणुकीच्या काळात या कंपन्यांचा कच्च्या तेलावर अवलंबून असल्याचा दावा फोल ठरला आहे. कंपन्या सरकारवर अवलंबून असल्याचे आढळून आले आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार आज, देशाची राजधानी नवी दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये प्रती लिटर तर डिझेल 86.67 रुपये प्रती लिटर आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये प्रती लिटर आणि डिझेल 94.14 रुपये प्रती लिटर आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल 104.67 रुपये प्रती लिटर आणि डिझेल 89.79 रुपये प्रती लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 101.40 आणि डिझेल 91.43 रुपये प्रती लिटर आहे. लखनौमध्ये पेट्रोल 95.14 आणि डिझेल 86.68 रुपये प्रती लिटर आहे. बिहारमधील पाटणा येथे पेट्रोल 105.90 रुपये आणि डिझेल 91.09 रुपये प्रती लिटर आहे.
पेट्रोल-डिझेलचे नवे दर तुम्ही SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP यासोबत आपल्या शहराचा कोड नंबर लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करू शकतात. BPCLचे ग्राहक RSP लिहून ९२२३११२२२२ या क्रमांकावर मेसेज करून माहिती मिळवू शकतात. तर HPCL चे ग्राहक HPPrice लिहून ९२२२२०११२२ या क्रमांकावर मेसेज पाठवून दर जाणून घेऊ शकतात.